शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By भाषा|

...तर 2015 पर्यंत खेळणार- सचिन

सन 2011 मधील विश्वकरंडक भारताला मिळवून देणे आणि तंदुरुस्त राहिल्यास सन 2015 पर्यंत क्रिकेट खेळणे हे दोन उद्दिष्ट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने ठेवले आहे. सचिनने प्रथमच आपल्या क्रिकेटमधील भविष्याबाबत मत व्यक्त केले.

15 नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 20 वर्ष पूर्ण करणार्‍या सचिनने सांगितले की, जर सन 2015 पर्यंत मी खेळत राहिलो तर मला खूप आनंद होईल. परंतु सध्या मी इतक्या लांब पल्याचा विचार करीत नाही. माझे सर्व लक्ष आगामी सामन्यावंर आहे. मी आतापर्यंत ‍क्रिकेटच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला आहे.

माझ्यात अजून खूप क्रिकेट शिल्लक आहे. सध्यातरी सर्वकाही सुरळीत सुरु आहे, असे सचिनने सांगितले. नुकतेच भारतीय क्रिकेटष संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने सचिन सन 2015 मधील विश्वकरंडक स्पर्धा खेळू शकतो, असे मत व्यक्त केले होते.