15 नोव्हेंबर 1989 एका 16 वर्षीय मुलाने कराचीमध्ये पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केला. हा मुलगा भविष्यात क्रिकेटची गाथा बनून राहील, असे भविष्य कोणी वर्तविले असते तर त्याला मुर्खात काढले गेले असते. परंतु गेली 20 वर्ष क्रिकेटमध्ये सचिन नावाचे वादळ घोंघावत आहे. या वादाळाने अनेक नवीन विक्रम प्रस्थापिक केले आहे. त्याची दखल गॅरी सोबर्स, डॉन ब्रॅडमनपासून अनेक दिग्गजांनी घेतली आहे. क्रिकेटमध्ये दोन दशके पूर्ण करणार्या सचिन रमेश तेंडुलकरची कारकीर्द शब्दांमध्ये मांडणे अशक्यच आहे, अशी अतुलनीय कामगिरी त्याच्याकडून झाली आहे.
ND
ND
मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात जन्मलेला सचिन तेंडुलकर शाळेत असताना क्रिकेटमुळे प्रसिद्धीच्या झोत्यात आला. त्याने हॅरीस शिल्ड स्पर्धेत विनोद कांबळीबरोबर 664 धावांची भागेदारी केली होती. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची सुरवात निराशाजनक राहिली. कराचीतील पहिल्या सामन्यात 15 धावांवर तो बाद झाला होतो. पहिल्या एकदिवसीय सामन्यात तर त्याला भोपळाही फोडता आला नव्हता. परंतु 1991 मधील ऑस्ट्रेलिया दौर्यात सचिन नावाच्या कोहीनूर भारताला गवसल्याचे स्पष्ट झाले. ऑस्ट्रेलियातील वेगवान आणि उसळत्या खेळपट्यांवर त्याने शतकी खेळू करुन आपली फलंदाजीतील ताकद दाखवून दिली. एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा त्याच्या नावावर असताना आजही त्याची धावाची भूक कमी झालेली नाही.
ND
ND
सचिनच्या विक्रमांवर नजर टाकल्यास त्याच्या अद्वितीय खेळाची कल्पना येईल. 159 कसोटी सामन्यात 54.58 च्या सरासरीने त्याच्या 12 हजार 773 धावा झाल्या आहेत. त्यात 42 शतके आणि 53 अर्धशतक आहे. 436 एकदिवसीय सामन्यात 44.50 च्या सरासरीने 17 हजार 178 धावा सचिनने कुटल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 30 हजार धावांचा टप्पा गाठणे यापुढे कोणाला शक्य होणार नाही. एकूण पेक्षा जास्त 70 विक्रम त्याच्या नावावर नोंदविले गेले आहे.
विक्रमांचा आणि प्रसिद्धीचा शिखरावर असूनही सचिन पूर्वी जसा आहे आताही तसाच आहे. तो आपल्या बॅटनेच जास्त बोलतो. क्रिकेटलाच आपले जीवन मानतो. अनेक वेळा दुखापतींनी डोके वर काढूनही तो आज तितक्याच कणखरपणे उभा आहे. दुखापतींनंतरही दमदार पुनरागमन करण्यात त्याचा हातखंडा आहे. सामाजिक कार्य करतानाही एका हाताची माहिती दुसर्या हाताला होऊ नये याची तो काळजी घेतो. यामुळे त्याने 200 मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलल्याची माहिती कितीतरी वर्षांनी सर्वांसमोर येते. या सर्वांमधून संस्कारक्षम सचिनही दिसून येता. यामुळे गेल्या 20 वर्षांमध्ये त्याच्या बाबतीत कधी वाद झाल्याचे आठवत नाही.