शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By भाषा|

सचिनचा 63 वा टॉप स्कोर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नाबाद 105 धावांची खेळी करीत भारतीय डावात 63 व्या वेळा टॉप स्कोर करण्याचा विक्रम केला. वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा याने 65 वेळा टॉप स्कोर केला आहे.

सचिनने नाबाद 105 धावा करीत आपल्या कारकिर्दीतील 44 शतक केले. यामुळे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार रिकी पॉंटिग त्याच्यापेक्षा पाच शतके मागे पडला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 1700 चौकारही सचिनने पूर्ण केले आहे. हा सन्मान मिळविणारा तो जगातील पहिला फलंदाज आहे. आता त्याचे 163 कसोटीत 1705 चौकार झाले.

सेहवागच्या कर्णधारपदाखाली सचिनचे हे पहिले शतक आहे. सचिन आतापर्यंत सात कर्णधारांच्या नेतृत्वाखाली खेळला आहे. सेहवागने तिसर्‍यांदा कसोटीत शतक केले आहे.