बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By वेबदुनिया|

सचिनचा 'वन-डे'ला गुडबाय!

WD
बीसीसीआयने 'ट्विटर'वरून सचिनच्या निवृत्तीचे वृत्त प्रसिद्ध केले. आपण एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करीत असल्याची माहिती सचिनने बीसीसीआयला दिली आहे. हे बघून त्याचे लाखो चाहते व अवघ्या क्रिकेटविश्वाला आश्चर्याचा धक्का बसला, मात्र हा निर्णय धक्कादायक नसल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. सचिनच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले.

बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांना उद्देशून ‍सचिनने बीसीसीआयला दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले, की विश्वविजेत्या भारतीय संघाचा सदस्य असल्याने, माजे स्वप्न पूर्ण झाले. 2015 साली विश्वचषकाचा किताब भारताकडे कायम राहण्यासाठी त्याची तयारी आतापासून करणे गरजेचे आहे. भारतीय क्रिकेय संघाच्या भविष्यातील कामगिरीसाठी मी संघाला शुभेच्‍छा देते. गेल्या अनेक वर्षांपासून माझ्यासोबत असलेल्या माझ्या चाहत्यांचे आणि प्रेक्षकांचे मी आभार मानतो, अशा शब्दांत वयाच्या सोळाव्या वर्षापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनने कृतज्ञता व्यक्त केली.

गेल्या काही महिन्यांपासून सचिन फॉर्ममध्ये नव्हता. सातत्यान अपयशी ठरत असल्याने त्याच्यावर मोठा प्रमाणात टीका सुरू झाली होती. उठसूठ कोणीही सचिनवर टीकर करणे सुरू केले होते व सोबतच निवृत्ती घेण्याचे अनाहुत सल्लेही त्याला देण्यात येत होते. प्रसारमाध्यमांनीही सचिनच्या निवृत्तीबाबत चर्चा घेऊन हा विषट लावून धरला होता. यामुळे कदाचित क्रिकेटच्या या विक्रमादित्यावर दबाव वाढला होता, मात्र बीसीसीआय किंवा अन्य कोणत्याही ज्येष्ठ क्रिकेटपटूने सचिनने निवृत्ती घ्यावी अशी इच्छा व्यक्त केलेली नव्हती.

उलट निवृत्तीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सचिनचा स्वत:चा असून, कोणी त्याला याबाबत सल्ला देण्याची गरज नसल्याचेच क्रिकेटविश्वाने सचिनला कायम सांगितले आहे. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा सनिचा निर्णय अवघ्या क्रिकेटविश्वाला आश्चर्याचा धक्का देणारे आहे. तथापि काही आजी माजी क्रिकेटपटुंनी सचिनच्या निवृत्तीवर आश्चर्य व्यक्त केले आहे तर काहींनी हा निर्णय योग्य असल्याचाही निर्वाळाही दिला.

'टाइम'नेही केला सचिनचा गौरव!
प्रत्येकाला वेळेचा सामना करावाच लागतो, मात्र सचिनसमोर जाणे वेळही थिजला. आपल्याकडे चॅम्पियन होते. आपल्याकडे लिजंडडी आहेत, मात्र आपल्याकडे दुसरा सचिन कधीच नव्हता ना! दुसरा सचिन कधी होईल, अशा शब्दात जगप्रसिद्ध 'टाइम' नियतकालिकाने सचिनचा गौरव केला आहे.