मंगळवार, 27 जानेवारी 2026
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. क्रिकेट मराठी
  4. »
  5. सचिन तेंडुलकर
Written By वेबदुनिया|

सचिनचे 44 वे शतक

सचिन तेंडुलकर भारत क्रिकेट
कॉम्पॅक कप तिरंगी मालिकेतील श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शतक करीत कारकिर्दीतील 44 शतक पूर्ण केले. तसेच या या मैदानावर एक हजार धावा करण्याचा विक्रमही त्याने केला.

कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराचा हा निर्णय सलामीस सचिन तेंडुलकर बरोबर आलेल्या राहूल द्रविडनेही योग्य ठरविला. त्याने सचिनच्या साथीने 95 धावांची भागिदारी केली. द्रविड 39 धावांवर असताना जयसूर्याच्या गोलंदाजीवर दिलशानकडे झेल देऊन बाद झाला. यानंतर कर्णधार धोनीने तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला येत सचिन बरोबर 110 धावांची भागेदारी केली. सचिनने 92 चेंडूत घणाघाती 100 धावा केल्या. सामन्यात त्याने 133 चेंडूत 138 धावा केल्या.

सचिन आपल्या समकालीन खेळाडूंपेक्षा खूप लांब चालला गेला आहे. त्याने 44 शतक पूर्ण केले असून श्रीलंकेचा सनथ जयसूर्या याने 28 शतक केल आहेत. रिकी पॉटिंग 26 शतकांसह तिसर्‍या स्थानावर आहे. सचिन आणि पॉटिंगमध्ये 18 शतकांचा फरक आहे. हा फरक भरुन काढणे अशक्य बाब आहे.

हर्षल गिब्स (21), ख्रिस गेल (19), जॅक कालिस (16) शतक करुन सचिनपासून खूप लांब आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन इतर खेळांपेक्षा खूप पुढे आहे. सचिनने 428 सामन्यांमध्ये 16 हजार 863 धावा केल्या आहेत. जयसूर्या 13 हजार 307 धावा करुन दुसर्‍या स्थानावर आहे. पॉटिंग 11 हजार 571 धावांसह तिसर्‍या स्थानावर आहे.