मंगळवार, 18 नोव्हेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 27 ऑक्टोबर 2015 (10:23 IST)

आरोग्याचा परिणाम होतो खेळावर: सायना

बॅडमिंटनपटू सायना नेहवाल
नागपूर- शंभर टक्के तंदुरुस्त नसल्यामुळे आपल्या खेळावर याचा विपरित परिणाम होत असल्याचे भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने कबूल केले आहे.

पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळेच गेल्या महिनाभरापासून आपल्याला अनेकदा पराभवाचे तोंड बघावे लागले असेही सायनाने सांगितले. मागील काही सामन्यांमध्ये ती दुसर्‍या फेरीतच गारद झाली होती. त्यामुळे तिचे जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानही घसरले होते.