शुक्रवार, 3 ऑक्टोबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: विम्बल्डन , शनिवार, 11 जुलै 2015 (10:25 IST)

जोकोविक अंतिम फेरीत

novak jokovik
नोवाक जोकोविकने शुक्रवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच पुरूष एकेरीत रिचर्ड गॅसकेटचा 7-6, 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव करीत अंतिम फेरी गाठली.
 
गेल्या पाच वर्षात जोकोविकने चौथ्यांदा विम्बल्डनची अंतिम फेरी गाठली आहे. डाव्या खांद्यावर उपचार करुन घेत उपान्त्य सामना खेळणारा जोकोविक म्हणाला, अंतिम सामन्यात माझा खांदा पूर्णपणे बरा झालेला असेल. विम्बल्डनचा अंतिम सामना जगात सर्वाधिक पाहिला जातो. त्यामुळे चांगला खेळ करण्याची आपल्यावर जबाबदारी आहे.