महान बॉक्सर मोहम्मद यांचे निधन

न्यूयॉर्क| Last Modified शनिवार, 4 जून 2016 (12:33 IST)महान मुक्केबाज (मुष्टियुद्ध) मोहम्मद अली यांचे शनिवारी अमेरिकेतील एका दवाखान्यात निधन झाले. ते 74 वर्षाचे होते. मोहम्मद अली यांच्या निधनाच्या बातमीमुळे जगभरातील बॉक्सिंग चाहत्यांनी दुख व्यक्त केला आहे. श्वसनास त्रास होऊ लागल्यामुळे मोहम्मद अली यांना शुक्रवारी अमेरिकेतील अॅरिझोना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथे उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली. अली यांच्या कुटुंबाचे प्रवक्ते बॉब गनेल यांनी त्यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. मोहम्मद अली यांच्या निधनामुळे फक्त एक महान खेळाडू नव्हे तर जगातील मानवी हक्क चळवळीस प्रेरणा देणारा एक खंदा कार्यकर्ता हरवल्याची भावना व्यक्त होत आहे.
'अली यांची प्रकृती खूप ढासळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना सर्वोत्तम उपचार देण्यात येत आहेत' असे निवेदन कालच गनेल यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आले होते. मात्र अवघ्या काही तासांतच अली यांची प्रकृती ढासळली व त्यांची प्राणज्योत मालवली.

बॉक्सिंगच्या दुनियेतील महान खेळाडू असलेले अली यांची 'हेविवेट चॅम्पियन' अशी ओळख होती. तीनेवळा वर्ल्ड चॅम्पियन ठरलेल्या मोहम्मद अलींनी ऑलिंपिकमध्ये मुष्टियुद्ध खेळात सुवर्णपदक जिंकले होते.

मात्र बॉक्सिंगमधून निवृत्त झाल्यानंतर १९८४ साली ते पार्किन्सन आजारामुळे त्रस्त होते, त्या आजाराशी त्यांनी अनेक वर्ष लढा दिला. मात्र याच आजाराने आज त्यांना हरवले.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती व श्वसनास होऊ लागलेल्या त्रासामुळे त्यांनादोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


यावर अधिक वाचा :

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, ...

Corona virus ची भीती, काय प्रत्येकाला मास्क लावणे आवश्यक, आरोग्य मंत्रालयाने जारी केले निर्देश
भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारने यासाठी तयारी केलेली ...

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी

महाराष्ट्रात कोरोनाचा पहिला बळी
देशभरात करोना व्हायरसमुळे काळजीचं वातरवारण पसरलं असताना महाराष्ट्रात या आजरामुळे पहिल्या ...

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात

राज्यात कोरोना रुग्ण संख्या ३९, १०८ लोक विलगिकरण कक्षात
राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील ...

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय माहीत हवेत

कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे 11 मोठे निर्णय  माहीत हवेत
– राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलल्या. – ग्रामीण ...

पुणे : दुकाने 3 दिवस बंद

पुणे : दुकाने 3 दिवस बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली दुकानं पुढील तीन दिवस बंद राहणार आहेत. कोरोनाचा फैलाव ...

चीनमध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण आढळले

चीनमध्ये कोरोनाचे ३९ रुग्ण आढळले
चीननं कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवल्याचं आकडेवारीवरुन दिसत होतं. मात्र आता पुन्हा ...

मोदींनी सांगितलेले 'हे' पाच संकल्प

मोदींनी सांगितलेले 'हे' पाच संकल्प
सध्या सर्वत्र करोनानं थैमान घातलं आहे, करोनाविरुद्धतीची ही लढाई फार मोठी आहे. आपण ...

बाप्परे, ४३ डॉक्टर, ५० वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी ...

बाप्परे, ४३ डॉक्टर, ५० वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी क्वारंटाईन
पिंपरी-चिंचवड शहरात ४३ डॉक्टर आणि ५० वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना क्वारंटाईन ...

खेळाडूंचा पगार कापण्यावर गावसकरांकडून खिल्ली

खेळाडूंचा पगार कापण्यावर गावसकरांकडून खिल्ली
जर स्पर्धा रद्द झाल्या तर भारतीय क्रिकेटपटूंचे पगार कापण्यात येतील, असे वक्तव्य भारतीय ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’ पुन्हा ...

आजपासून साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘खिचडी’  पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला
लॉकडाउनमुळे ८० आणि ९०च्या दशाकातील दूरदर्शन वाहिनीवरील मालिका पुन्हा दाखवण्यास सुरुवात ...