शनिवार, 1 नोव्हेंबर 2025
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By wd|
Last Modified: ग्लास्गो , शनिवार, 26 जुलै 2014 (10:39 IST)

राष्ट्रकुलमध्ये भारताला आणखी एक गोल्ड, सिल्वर मेडल

abhinay bindra
भारताचा नेमबाज अभिनव बिंद्रा याने दहा मीटर एअर रायफल प्रकारात 'गोल्ड' मेडल पटकावले. या यशासोबत भारताने पदतालिकेत चौथा क्रमांक पटकावला आहे. भारताने आतापर्यंत तीन गोल्ड, चार सिल्वर, दोन ब्राँझ मेडल पटकावले आहेत.
 
राष्ट्रकुलाचा शुक्रवारी दुसरा दिवस होता. 16 वर्षीय मलाईका गोयल हिला सिल्वर मेडल पटकावले. दहा मीटर एअर पिस्तूल या प्रकारामध्ये मलाईकाने हे पदक मिळविले. जागतिक क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी असलेल्या भारताच्या हिना सिद्धू पात्रता फेरीत पहिल्या क्रमांकावर असूनही अंतिम फेरीत तिला कामगिरीत सातत्य राखता आले नाही. त्यामुळे तिची पदकाची संधी हुकली. पात्रता फेरीमध्ये हिना सिद्धूने 383, तर मलाईका गोयलने 378 गुण मिळविले होते.
 
दुसरीकडे, भारताच्या महिला टीमने हॉकीमध्ये विजय मिळविला आहे. महिला संघाप्रमाणेच भारतीय पुरुष हॉकी संघानेही राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये दमदार विजयी सलामी दिली. पुरुषांच्या सलामीच्या सामन्यात भारताने वेल्सवर 3-1 असा विजय मिळवला.