शनिवार, 6 डिसेंबर 2025
  1. वृत्त-जगत
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 13 एप्रिल 2015 (11:18 IST)

सानिया महिला दुहेरीमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल

sania mirza
सानिया मिर्झाने जागतिक क्रमवारीत महिला दुहेरीमध्ये अव्वल स्थान पटकावत भारताच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. महिला दुहेरीमध्ये अव्वल ठरणारी सानिया ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. सानियाने मार्टिना हिंगीसच्या साथीने फॅमिली सर्कल कप खिशात घातला.
 
सानिया आणि मार्टिना या जोडीने कॅसी डेलाक्वा आणि दार्या जुराक या जोडीवर 6-0, 6-4 अशी मात केली. विजेतेपदासोबतच सानियाने अव्वल स्थानालाही गवसणी घातली आहे.इंडियन वेल्स आणि मयामि ओपनपाठोपाठ सानिया आणि मार्टिनाचे हे सलग तिसरे जेतेपद ठरले. सानिया आणि मार्टिनाने टीम म्हणून सलग 14 वेळा विजय मिळवला आहे.
 
महिला दुहेरीमध्ये अव्वल ठरणारी सानिया ही पहिलीच भारतीय खेळाडू ठरली आहे. याआधी 90च्या दशकात लिअँडर पेस आणि महेश भूपतीने अशी कामगिरी बजावली होती. काही दिवसांपूर्वीच बॅडमिंटनमध्ये फुलराणी सायना नेहवालने पहिले स्थान पटकावले होते. त्यानंतर टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत सानियाने मिळवलेल्या वर्चस्वामुळे भारतीयांची कॉलर पुन्हा टाईट झाली आहे.