‘फुलराणी’सायना विजेती

सिडनी| Last Modified सोमवार, 13 जून 2016 (07:57 IST)
ऑस्ट्रेलियन खुली बॅडमिंटन स्पर्धा
फुलराणी सायना नेहवालने चाहत्यांनाच नव्हे तर स्वत:लाही सुखद धक्का देत ऑस्ट्रेलियन ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. सायनाने अंतिम फेरीत सून यू हिचा 11-21, 21-14, 21-19 असा पराभव केला.
सायनाने तिच्यापेक्षा सरस जागतिक मानांकन असलेल्या वँग हिान हिला उपान्त्य लढतीत दोन गेममध्येच हरवले होते. आता तिने अंतिम फेरीत चीनच्याच सून यू हिचा पहिला गेम गमावूनही जोरदार कमबॅक करत पराभव केला. सायनाने पहिला गेम 11-21 असा गमाविल्यानंतर दुसर्‍या गेममध्ये सुरुवातीपासूनच आघाडी टीकवत 21-14 असा दुसरा गेम जिंकला. त्यानंतर तिसर्‍या निर्णायक गेममध्ये सायना आणि सुन यांच्यात चुरस पाहायला मिळाली. अखेर सायनाने 21-19 अशी बाजी मारत विजेतेपद आपल्या नावावर केले.

या स्पर्धेचे तिने दुस-यांदा विजेतेपद मिळविले आहे. गेल्या काही महिन्यांत साईनाच्या खेळात सातत्याचा अभाव होता. ती अनेक चुका करीत होती, त्यामुळे साईना तर कोर्टवर कुठेच दिसत नाही, असे म्हटले जात असे; पण आज तिने जबरदस्त हुकमत राखत हे विजेतेपद मिळविले आहे. फटक्‍यांची निवड कशी करावी हेच साईनाने दाखवून दिले. तिने बेसलाइनवरून; तसेच कोर्टच्या मध्यावरून मारलेले स्मॅशेस विजयी ठरत होते. या मोसमातील साईनाचे पहिले विजेतेपद आहे. रिओ ऑलिंपिकपूर्वी साईनाने मिळविलेले हे विजेतेपद खूप महत्त्वाचे आहे. यापूर्वी सायनाने आतापर्यंत सुआनविरुद्धच्या सहा लढतींपैकी पाच लढतींमध्ये विजय मिळविला आहे. सायनाने २०१४ मध्ये ऑस्टड्ढेलियन ओपन स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते मात्र सुपरसीरिजमध्ये तिला विजेतेपदाने हुलकावणी दिली होती.

रिओच्या दृष्टीने महत्त्वाचे सायनाची कामगिरी रिओ ऑलिम्पिकआधी उत्साहात भर घालणारी असून, याद्वारे तिने आपण ऑलिम्पिकसाठी फिट असल्याचे संकेतही दिले. सायना २०१४ मध्ये ऑस्टड्ढेलियन ओपन विजेती राहिलेली आहे. काही दिवसांपासून फुुलराणी सायनाची कामगिरी तिला साजेशी होत नव्हती. सायनाचे हे दुसरे ऑस्टड्ढेलियन जेतेपद आहे. आगामी रिओ ऑलिंपिक स्पर्धेआधी तिने मिळवलेले ऑस्टड्ढेलियन ओपनचे जेतेपद तिचा आत्मविश्वास वाढवणारे ठरेल.


यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

फडणवीस यांच्यात राष्ट्रीय नेते होण्याची क्षमता आहे : संजय ...

फडणवीस यांच्यात राष्ट्रीय नेते होण्याची क्षमता आहे :  संजय राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र ...

वाचा, विजय वडेट्टीवार यांनी काय केला गौप्यस्फोट

वाचा, विजय वडेट्टीवार यांनी काय केला गौप्यस्फोट
एका वृत्त वाहिनीशी बोलताना काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार ...

पंतप्रधान मोदी सी विमानातून केवडिया येथून साबरमती ...

पंतप्रधान मोदी सी विमानातून केवडिया येथून साबरमती रिव्हरफ्रंटला पोहोचले, 30 मिनिटांत 200 किमी अंतर
लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 145 व्या जयंतीनिमित्त केवडिया येथील स्टॅच्यू ऑफ ...

मुंबई बिघडविणार दिल्लीचे समीकरण?

मुंबई बिघडविणार दिल्लीचे समीकरण?
मुंबई इंडियन्सने प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. मात्र, ते दिल्ली ...

फुलराणी पारुपल्लीसोबत मालदीवमध्ये करीत आहे सुट्टी एन्जॉय

फुलराणी पारुपल्लीसोबत मालदीवमध्ये करीत आहे सुट्टी एन्जॉय
भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल व तिचा पती पारुपल्ली कश्यक सध्या मालदीवमध्ये ...