बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

अडवाणी बाद फेरीसाठी पात्र

बिसेक- किर्जीस्थान येथे सुरू असलेल्या आशियाई 6- रेड स्नूकर आणि सांधिक स्पर्धेत भारताच्या पंकज अडवाणीने बाद फेरीत स्थान मिळवले आहे. या स्पर्धेत अडवाणीने आपल्या गटातील तीन सामने जिंकले आहेत. 16 वेळा विश्व विजेतेपद मिळविणार्‍या अडवाणीने थायलंडच्या फोनबंदचा 5-2 तर  त्यानंतर इराणच्या रोशनीकियाचा 5-3 अशा पेमस्कमध्ये पराभव केला. त्यांनतर तिसर्‍या सामन्यात अडवाणीने इराकच्या ओमरअलीवर 3-1 अशी मात करत बादफेरीत स्थान मिळविले.
 
या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या फैजलखान, पुष्पेंदरसिंग आणि कमल चावला यानी प्रत्येकी एक सामना जिंकला असून एक सामना गमविला आहे.