मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 20 नोव्हेंबर 2024 (18:12 IST)

Badminton: लक्ष्य-सिंधू आणि मालविका चायना मास्टर्सच्या दुसऱ्या फेरीत

P V sindhu
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेता पीव्ही सिंधू, लक्ष्य सेन आणि मालविका बनसोड यांनी बुधवारी सामना जिंकून चायना मास्टर्स सुपर 750 बॅडमिंटनच्या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. 

सिंधूने महिला गटात 50 मिनिटे चाललेल्या पहिल्या फेरीच्या लढतीत तिच्या उच्च मानांकित थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानचा 21-17, 21-19 असा पराभव केला.
 
मालविकाने (36 वे रँकिंग) डेन्मार्कच्या लिन होजमार्क जेगर्सफेल्ट (21वे रँकिंग) हिच्यावर 20-22, 23-21, 21-16 असा विजय मिळवला. पुरुष गटात लक्ष्यने ऑलिम्पिक कांस्यपदकाच्या लढतीतील पराभवाचा बदला मलेशियाच्या सातव्या मानांकित ली झी जियावर 57 मिनिटांत 21-14, 13-21, 21-13 असा मोडून काढला. लक्ष्याचा सामना डेन्मार्कचा रासमुस गेमके आणि जपानचा केंटा निशिमोटो यांच्यातील विजेत्याशी होईल.
Edited By - Priya Dixit