Chess : कार्लसन विजेता, विश्वनाथन आनंद तिसऱ्या स्थानावर
पाच वेळा विश्वविजेता आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनने कॅसाब्लांका बुद्धिबळ प्रकार स्पर्धा जिंकली आहे. त्याचवेळी पाच वेळा विश्वविजेता भारतीय ग्रँड मास्टर विश्वनाथन आनंद तिसऱ्या स्थानावर राहिला. आनंदचा कार्लसनसोबतचा स्पर्धेतील दुसरा सामना अनिर्णित राहिला.
आनंदने इजिप्तच्या अमीन बसेमचा पराभव केला. या स्पर्धेतील त्याचा हा एकमेव विजय ठरला. कार्लसनने साडेचार आणि आनंदने सहा फेऱ्यांमध्ये तीन गुण मिळवले.अमेरिकेचा हिकारू नाकामुरा साडेतीन गुणांसह दुसऱ्या तर बासेम एका गुणासह चौथ्या आणि शेवटच्या स्थानावर होता.
ही अनोखी स्पर्धा नव्या प्रयोगावर आधारित होती. यामध्ये बुद्धिबळ जगतातील ऐतिहासिक सामन्यांसारखीच स्थिती चार खेळाडूंसमोर ठेवण्यात आली होती. त्यांना दिलेल्या पोझिशनपासून खेळाला सुरुवात करून सामना पुढे न्यायचा होता. कार्लसनने पहिल्या फेरीत आनंदचा पराभव केला.
कार्लसननेपाचव्या फेरीत नाकामुरा आणि आनंदचा सामना अनिर्णित राहिला, तर कार्लसनने अमीनचा पराभव केला. सहाव्या फेरीत कार्लसन-नाकामुरा यांनी बरोबरी साधली आणि आनंदने अमीनचा पराभव केला.
Edited by - Priya Dixit