कोको गॉफला कोरोना; ऑलिम्पिकचे स्वप्न भंगले
अमेरिकन स्टार महिला टेनिसपटू कोको गॉफला कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे, ती 23 जुलैपासून सुरू होणार टोक्यो ऑलिम्पिकमध्ये खेळताना दिसणार नाही. महिला टेनिस क्रमवारीत कोको 25व्या स्थानावर आहे. कोकोने रविवारी रात्री उशिरा ट्विटरवर आपल्याला कोरोना झाल्याचे आणि ऑलिम्पिकमध्ये न खेळण्याविषयी सांगितले. कोको ऑलिम्पिकमध्ये महिला एकेरीत आणि महिला दुहेरीत भागीदार निकोल मेलिचरसह भाग घेणार होती.
कोकोने लिहिले, मी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे आणि टोक्यो ऑलिम्पिकमध्ये खेळू शकणार नाही. यामुळे मी फार निराश झाली आहे. ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेचे प्रतिनिधित्व करणे हे माझे नेहमीच स्वप्न राहिले आहे आणि मला आशा आहे की भविष्यात हे वास्तव घडवून आणण्यासाठी माझ्याकडे आणखी बरच संधी असतील. मला माझ्या संघाला आणि प्रत्येक ऑलिम्पियनला शुभेच्छा द्यायचा आहेत. ऑलिम्पिकमध्ये अमेरिकेच्या 12 सदस्यीय टेनिस संघाचे नेतृत्व कोको करणार होती. सेरेना आणि व्हिनस विलियम्सशिवाय 25 वर्षांत पहिल्यांदा अमेरिकेचासंघ खेळणार आहे.