1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
  4. Dattu Baban Bhokanal, Olympic athlete

दत्तू 100 च्या ट्रकवर!

रिओ, ब्राझिल येथे झालेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत रोइंग प्रकारात अंतिम फेरीपर्यंत मजल मारणारा महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातला दत्तू भोकनळ आता अमेरिकेत होणार्‍या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी जय्यत तयारी करत असला तरी त्यासोबत त्याची आणखी एक तयारी सुरू आहे ती 100 मीटर धावण्याच्या शर्यतीची.
 
उत्तम उंची, योग्य शरीरयष्टी लाभलेला दत्तू 100 मीटर धावण्याच्या क्रीडाप्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा बाळगून आहे. क्रीडा पुरस्कारांसाठी मुंबईत आलेला असताना दत्तूने आपल्या नव्या आव्हानाविषयी सांगितले.
पुढील लेख
तामिळनाडूत भाजप उमेदवाराला मिळाली रजनीकांतची साथ