गुकेश फिरोजाकडून पराभूत, विजयाची मोहिम संपली
फ्रीस्टाइल बुद्धिबळ ग्रँड स्लॅममध्ये सातव्या स्थानाच्या प्लेऑफ सामन्याच्या दुसऱ्या गेममध्ये इराणी वंशाच्या फ्रेंच खेळाडू अलिरेझा फिरोजाकडून पराभव पत्करावा लागल्याने विश्वविजेता डी गुकेश शेवटच्या स्थानावर राहिला. अशाप्रकारे, गुकेशला या स्पर्धेत एकही विजय मिळवता आला नाही आणि त्याची मोहीम निराशेत संपली.
गुकेश आणि फिरोजा यांच्यातील पहिला सामना अनिर्णित राहिला. भारतीय खेळाडू दुसरा गेम पांढऱ्या मोहऱ्यांसह खेळत होता पण तो त्याचा फायदा घेऊ शकला नाही आणि 30 चाली चाललेल्या गेममध्ये त्याला पराभव स्वीकारावा लागला. दरम्यान, जर्मनीच्या व्हिन्सेंट कीमरने आपली चांगली कामगिरी सुरू ठेवत जेतेपद पटकावले. स्पर्धेच्या सुरुवातीला त्याला सर्वात कमकुवत खेळाडू मानले जात होते
स्पर्धेपूर्वी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात होते परंतु अखेर त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंची अंतिम क्रमवारी खालीलप्रमाणे होती: 1. व्हिन्सेंट कीमर; 3. फॅबियानो कारुआना; 3. मॅग्नस कार्लसन; 4. जावोखिर सिंदारोव; 5. हिकारू नाकामुरा; 6. नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्ह; 7. अलिरेझा फिरोजा; 8. डी. गुकेश
Edited By - Priya Dixit