शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: कॅनडा , गुरूवार, 9 फेब्रुवारी 2017 (14:27 IST)

टेनिसपटू युजिनी बुशार्डला पैज पडली भारी

कॅनडाची स्टार टेनिसपटू सौंदर्यवती युजिनी बुशहार्डला फॅनबरोबर लावलेली पैज महागात पडली आहे. खास पद्धतीने, खास जागी ही पैज लावली गेली व युजिनी पैज हरली तर केली गेलेली मागणीही खासच होती. ही पैज ट्विटरवर ट्वीट करून लावली गेली व पैज जिंकली तर युजिनीने डेटवर चलावे अशी मागणी पैज लावणार्‍याने केली होती. आता युजिनी या पैजेची पूर्तता कधी करते हे पाहायचे. झाले असे की, अमेरिकन सुपरबाऊल 51 मध्ये न्यू इंग्लंड पेट्रीऑटस व अटलांटा फाल्कन यांच्या सामना सुरू होता. सुरवातीलाच अटलांटा टीम पुढे होती व त्यांनी 28-3 असे लीड घेतले तेव्हा बुशार्डने अटलांटा जिंकणार असे ट्विट केले त्याला तिच्या फॅनने रिट्वीट करून युजिनी पैज हरली तर तिने डेटवर चलावे असे उत्तम दिले.