बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

हॉकीला खूप चांगले दिवस मात्र प्रशिक्षक देशीच हवा- धनराज पिल्ले

हॉकी क्रीडा प्रकाराला सध्या चांगले दिवस आले आहे.  राष्ट्रीय प्रेम टिकवून ठेवणे गरजेचे असून  आणि संघात एकजूट ठेवण्यासाठी कोणत्याही संघाचा प्रशिक्षक हा भारतीयच असायला हवा. भारतीय प्रशिक्षकांनी दिलेल्या प्रशिक्षणामुळे मी उत्कृष्ठ कामगीरी करू शकलो. असे प्रतिपादन भारतीय संघाचा माजी कर्णधार पद्मश्री धनराज पिल्ले यांनी केले.

नाशिक सायलिस्टतर्फे आयोजित जायंट स्टारकेन नाशिक पेलेटॉन 2017 च्या पारितोषिक वितरण प्रसंगी पत्रकाराशी संवाद साधतांना ते बोलत होते. पिल्ले म्हणाले, ज्युनिअर वर्डकप जिंकलेल्या संघाला अधिक पाठबळ देण्याची गरज आहे. तसे झाल्यास 2020 च्या टोकीयो ऑलिम्पिकमध्ये भारतीय संघ निश्चितच पदक मिळवू शकेल. तरुण खेळाडूंनी  मैदानावरील सरावास अधिक वेळ द्यालया हवा मात्र अनेकदा ते सोशल मिडीया आणि संगणक आदी ठिकाणी बैठे खेळ खेळताना दिसतात त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होतात.. तसेच आपल्याकडे अनेक अनुभवी प्रशिक्षक असून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग देशासाठी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगीतले आहे.