शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मार्च 2017 (15:01 IST)

नडालचा पराभव करून क्वार्टरफाइनलमध्ये पोहोचला फेडरर

इंडियन वेल्स: स्विस स्टार रोजर फेडररने आज येथे बीएनपी परिबस ओपनच्या चवथ्या डावामध्ये राफेल नडालला 6-2 6-3ने पराजित करून क्वार्टरफाइनलमध्ये प्रवेश केला. फेडररने चारवेळा नडालची सर्विस मोडली आणि आता त्याची भिडतं   किर्गियोसशी होणार आहे. टेनिसचा एक इतर धुरंधर नोवाक जोकोविच सुरुवातीला पराभूत होऊन स्पर्धेबाहेर झाला आहे.  
 
तो निक किर्गियोसशी 4-6, 6-7 ने पराभूत झाला. किर्गियोसने या प्रकारे दोन आठवड्यात दुसर्‍यांदा जोकोविचला मात दिली. त्याने दोन मार्चला एकापुलकोमध्ये देखील जगातील दुसर्‍या नंबरच्या खेळाडूचे पराभव केले होते.  
 
17व्या वरीय जैक सोकने मालेक जाजिरीला 4-6, 7-6, 7-5ने पराभूत केले. पाब्लो कारेनो बुस्ताने क्वालीफायर दुसान लाजोविच आणि पाब्लो क्यूवासने डेविड गोफिनला मात दिली. महिला वर्गात आठव्या नंबरवर असणार्‍या स्वेतलाना कुज्नेत्सोवाने 19व्या नंबरच्या अनास्तासिया पावलीयुचेंकोवाला 6-3 6-2ने पराभूत करून सेमीफाइनलमध्ये प्रवेश केला.