1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
  4. internation player rehan shekh

आंतरराष्ट्रीय खेळाडूचा पाण्याच्या टाकीवरून पडून मृत्यू

भिवंडी तालुक्यातील अनगांवचा आंतरराष्ट्रीय खेळाडू रेहान शेख (17) याचा पाण्याच्या टाकीवरून पडून मृत्यू झाला आहे. लंगडी खेळात गोल्ड मेडल मिळवले होते. 

 
पुढच्या महिन्यात नेपाळ येथे होणा-या आंतरराष्ट्रीय लंगडी स्पर्धेमध्ये त्याची निवड करण्यात आली होती. मंगळवारी रात्री राहत्या इमारतीच्या तीस-या मजल्यावरील पाणी सोडण्यासाठी गेला असता टाकीवरुन खाली पडल्यामुळे त्याला मार लागला, उपचारासाठी त्याला सिराज रूग्णालयात दाखल केले असता डाक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पुढील लेख
मितालीने केल्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा