सोमवार, 1 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 21 डिसेंबर 2022 (10:31 IST)

Lionel Messi: सेलिब्रेशन दरम्यान लिओनेल मेस्सी आणि अर्जेंटिना संघ थोडक्यात बचावला

Lionel Messi
FIFA विश्वचषक 2022 जिंकल्यानंतर अर्जेंटिनाचा संघ आपल्या देशात परतला आहे. येथे टीमचे खेळाडू 36 वर्षांनंतर सर्व देशवासीय आणि फुटबॉल चाहत्यांसोबत विजयाचा आनंद साजरा करत आहेत. यादरम्यान अर्जेंटिनाचा संघ बसमध्ये ट्रॉफी घेऊन चाहत्यांसोबत रॅलीत सामील झाला. या रॅलीदरम्यान मोठी दुर्घटना टळली आणि मेस्सीसह पाच खेळाडू बचावले. 
 
अर्जेंटिनाचे सर्व खेळाडू ट्रॉफीसह बसमध्ये चढून रॅलीमध्ये सामील झाले. अर्जेंटिना संघ चाहत्यांसह शहरात फिरत होता. ट्रॉफी घेऊन जाणाऱ्या बसच्या छतावर मेस्सीसह पाच खेळाडू बसले होते. त्यानंतर या खेळाडूंसमोर विजेची तार आली. सुरुवातीला कोणाच्याच लक्षात आले नाही, पण योग्य वेळी एका खेळाडूने ते पाहिले आणि सर्वांना सावध केले. अखेरच्या क्षणी सर्व खेळाडू खाली वाकले आणि बस विजेच्या तारेखाली गेली. या तारेमुळे खेळाडूंना विजेचा धक्का बसण्याचा धोका जरी न्हवता, मात्र तारेवर आदळल्याने हे खेळाडू बसमधून खाली पडून मोठी दुर्घटना घडू शकली असती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.