शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: शनिवार, 8 मे 2021 (16:06 IST)

मलेशियन ओपन कोरोनामुळे स्थगित

कोरोनाच्या वाढत प्रादुर्भावामुळे मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा शुक्रवारी स्थगित करण्यात आली. ही स्पर्धा 25 ते 30 मे दरम्यान क्वालालंपूर येथे होणार होती. ही स्पर्धा स्थगित झाल्याने लंडन कांस्यपदक विजेती सायना नेहवाल, पुरुष खेळाडू किदाम्बी श्रीकांत यांना एक धक्का मानला जात आहे. कारण टोक्यो ऑलिम्पिकसाठी त्यांना आपली दावेदारी सिध्द करण्यासाठी केवळ दोन स्पर्धा बाकी होत्या व मलेशिया ओपन ही त्यापैकी एक होती. 11 ते 16 मे दरम्यान होणारी इंडिया ओपन स्थगित झाल्यानंतर सायना व श्रीकांत यांच्या अपेक्षा मलेशिया ओपन व नंतर सिंगापूर ओपन (1 ते 6 नोव्हेंबर) या स्पर्धेकडून होत्या. भारताच्या दोनही खेळाडूंना सिंगापूरमध्ये स्पर्धेत सहभागी होणे कठीण दिसत आहे. कारण त्या देशाने भारतातून येणार्याय विमानांवर निर्बंध आणले आहेत.
 
जागतिक बॅडमिंटन संघाने स्पष्ट केले की, आयोजक व संघाने सर्व भागीदारांना टुर्नामेंट सुरक्षित वातावरणात घेण्यासाठी आपल्यापरीने सर्व ते प्रयत्न केले. मात्र, नुकतेच कोरोनाने उग्र रूप धारण केल्याचे दिसून येत असल्यानेही स्पर्धा स्थगित करण्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. स्पर्धेचे नवे वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल व नव्याने होणारी ही स्पर्धा ऑलिम्पिक विंडो अंतर्गत असणार नाही.