मेरी कोमचं टोकियो ऑलिम्पिकमधलं आव्हान कसं आलं संपुष्टात?

mary kom
Last Modified गुरूवार, 29 जुलै 2021 (17:10 IST)
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदरी निराशा आली आहे. बॉक्सिंगपटू मेरी कोम यांचा पराभव झाला आहे.
भारताच्या स्टार खेळाडू एम.सी मेरी कोम बॉक्सिंग महिलांच्या 48-51 वजनाच्या गटातून बाहेर पडल्या आहेत. इनग्रिट व्हॅलेन्सिया यांनी मेरी कोम यांचा 3-2 असा पराभव केला आहे.

टोकियोमधून बीबीसीच्या जान्हवी मुळे यांचं विश्लेषण
कधीकधी विजयापेक्षाही तुम्ही कसे खेळलात हे जास्त महत्त्वाचं असतं. तुम्ही जाताना कसे बाहेर पडलात, हे महत्त्वाचं असतं आणि मेरी यांनी टोकियोत अखेरच्या क्षणापर्यंत लढत देताना दिसली.
2012 सालच्या लंडन ऑलिंपिकमध्ये ब्राँझ जिंकणाऱ्या मेरी यांना 2016 सालच्या रिओ ऑलिंपिकमधल्या ब्राँझ विजेत्या इनग्रिट व्हॅलेन्सिया या कोलंबियन बॉक्सरकडून पराभव स्वीकारावा लागला.

हा निकाल अजिबात एकतर्फी नव्हता, तर पंचांचे गुण विभागले गेले. पहिल्या फेरीत पिछाडीवर गेल्यावरही मेरी यांनी झुंजार लढा दिला पण तिला अखेर 2-3 असा पराभव स्वीकारावा लागला.

मेरी यांची ही लढाई पाहणाऱ्या प्रत्येकालाच लक्षात राहील. पराभव स्वीकारून बाहेर पडताना त्यांचं वर्तन, एवढं ग्रेसफुल होतं.
हे कदायित मेरी यांचं अखेरचं ऑलिंपिक ठरू शकतं.

2012 मध्ये मेरीनं कसं मिळवलं होतं ब्राँझ मेडल?
2012च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला आतापर्यंतची सर्वाधिक 6 मेडल मिळाली. पण या सगळ्यांतही ब्राँझ मेडल जिंकणारी मेरी कोम वेगळी होती.

मेरीचं वजन होतं 46 किलो. म्हणजे तब्बल पाच किलोंचा फरक होता. प्रयत्नपूर्वक मेरीने तीन किलो वजन वाढवलं आणि ऑलिम्पिकचा सराव म्हणून वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्येही 51 किलो वजनी गटात खेळायला सुरुवात केली.
मेरीचं वजन आता 48 ते 49 किलो म्हणजे वजनी गटाच्या खालच्या लिमिटवर होतं.पण तिच्यासमोरचं आव्हान वाढलं होतं. कारण, बरोबरचे प्रतिस्पर्धी 51 किलो गटात मुरलेले आणि ताकदवान होते. उलट मेरी स्पर्धेआधीच्या वे-इन म्हणजे अधिकृत वजन मोजण्याच्या प्रक्रियेत पोटात दोन लीटर पाणी साठवून जायची. आणि नंतर सॉना बाथ किंवा उष्ण वातावरणात व्यायाम करून हे पाणी शरीरातून काढून टाकायची. ही सगळी कसरत तिला ऑलिम्पिकसाठीही करावी लागली.
याबद्दल मेरीनं म्हटलं होतं, "समोर आव्हान काय आहे या गोष्टींनी मला फरक पडणार नव्हता. कारण, माझा निर्धार पक्का होता. लंडनच्या वातावरणाची सवय व्हावी म्हणून मी पंधरा दिवस आधी लिव्हरपूलमध्ये राहिले. मला मणिपुरी पद्धतीचा भात आणि मासे आवडतात. म्हणून बरोबर माझा प्रेशर कुकर नेला आणि रोज माझं जेवण मीच बनवलं. या भातात पिष्टमय पदार्थ पुरेपूर असतात, त्याचा मला फायदाही झाला."

"स्पर्धा म्हणाल तर माझ्यासाठी प्रत्येक मॅच कठीण होती. सगळेच प्रतिस्पर्धी माझ्यापेक्षा उंच होते. पण, स्पर्धेचं मला दडपण येत नाही ही माझी जमेची बाजू आहे."
स्पर्धेचं मेरीला खरंच दडपण येत नाही. म्हणूनच असेल कदाचित मॅचच्या दिवशी रिंगमध्ये मेरी हुशारीने वावरते. क्षणात निर्णय घेऊन तिथल्या तिथे रणनिती आखते आणि प्रत्यक्षात आणते.

तिची पोलिश प्रतिस्पर्धी कॅरोलिना विरुद्धची मॅच खूप वेळ चालली होती. मॅचनंतर मेरी दमली होती. शरीरही अवघडलं होतं. पण, लगेच दुसऱ्या दिवशी असलेल्या क्वार्टर फायनल मॅचसाठी मेरी कसोशीने तयार झाली. ही मॅच हरलो तर मेडलचं स्वप्नही भंग होईल हे माहीत असल्यामुळे आपली उरलीसुरली ताकद पणाला लावून क्वार्टर फायनलमध्ये राहिलीविरुद्ध मेरी खेळली.
फक्त ऑलिम्पिकच नाही तर तिच्या कारकीर्दीतली ती सर्वोत्तम मॅच होती असं मेरी मानते. तिने राहिलीला 15-6 ने हरवलं आणि सेमी फायनलमध्ये पोहोचत ब्राँझ पक्कं केलं. पुढे सेमी फायनलमध्ये मेरीची गाठ युकेच्या निकोला ॲडम्सशी पडली. निकोला या गटातली वर्ल्ड चॅम्पियन होती. आणि पुढे जाऊन तिने लंडनमध्ये गोल्डही जिंकलं. तिच्याविरुद्ध मेरीचा 6-11 असा पराभव झाला.


यावर अधिक वाचा :

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ...

बॉयफ्रेंडसाठी मुजफ्फरपूरमध्ये 'दंगल', मुलींनी एकमेकांचे केस ओढले
मुजफ्फरपूर: मुलींच्या अफेअरमध्ये तुम्ही मुलांमध्ये अनेकदा मारहाण करताना पाहिले असेल. आता ...

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू

भारतीय सैन्याच्या अपघात: 2 मृत्यू
जम्मू-काश्मीरच्या पाटणी टॉप भागात एक मोठा अपघात झाला आहे.नागाच्या मंदिराजवळ शिवगडच्या ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली ...

सोनू सूद : इन्कम टॅक्सचे छापे, राज्यसभेची ऑफर आणि बदललेली शिवसेना
बॉलीवूड अभिनेता सोनू सूदवर इनकम टॅक्स विभागाने 20 कोटींपेक्षा जास्त रूपयांची करचुकवेगिरी ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते ...

कोविशील्ड लस मंजूर, ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत ते USला जाऊ शकतील
कोरोनाव्हायरस विरुद्ध पूर्णपणे लसीकरण झालेल्या सर्व हवाई प्रवाशांसाठी अमेरिका ...

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत

सोयाबीनच्या किमतीत मोठी घसरण, शेतकरी चिंतेत
महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची समस्या कमी होण्याचे नाव घेत नाही आहे. काही ...

धक्कादायक ! अपंग मुलीवर फिजिओथेरपिस्ट कडून बलात्कार, ...

धक्कादायक ! अपंग मुलीवर फिजिओथेरपिस्ट कडून बलात्कार, आरोपीला अटक
मुंबईतील सांताक्रूझ येथील एका क्लिनिक मध्ये एका 40 वर्षीय फिजिओथेरपिस्ट ने एका 16 वर्षीय ...

पाकिस्तानमधील चीनच्या गुंतवणुकीत घट, इम्रान खान सरकारवर ...

पाकिस्तानमधील चीनच्या गुंतवणुकीत घट, इम्रान खान सरकारवर प्रश्नचिन्ह
पाकिस्तानच्या सेंट्रल बँक ऑफ पाकिस्तानने देशातील चिनी गुंतवणुकीत घट होत असल्याची आकडेवारी ...

लडाखमधील कारगिलजवळ भूकंपाचे धक्के

लडाखमधील कारगिलजवळ भूकंपाचे धक्के
लडाखमधील कारगिलजवळ रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा ...

भाजप नगरसेवकाच्या घरातून चोरटयांनी 50 तोळे सोने, किमती ...

भाजप नगरसेवकाच्या घरातून चोरटयांनी 50 तोळे सोने, किमती घड्यायासह तिजोरी उचलून नेली
नागपुरातील भाजप नगरसेवक संदीप गवई यांच्या घरातून चोरटयांनी तिजोरीच उचलून नेली. या ...

आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुणे, नाशिक, केंद्रावर पुन्हा ...

आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुणे, नाशिक, केंद्रावर पुन्हा गोंधळ झाला
आरोग्य विभागाची परीक्षा आज होणार असून पुणे, नाशिकच्या परीक्षा केंद्रावर आज पुन्हा गोंधळ ...