मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

मरे, केर्बर आयटीएफचे वर्ल्ड चॅम्पियन्स

पॅरिस- ब्रिटनच्या अँडी मरे व त्याचा बंधू जेमी मरे हे आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने 2016 मधील वर्ल्ड चॅम्पियन ठरले आहेत. महिलांमध्ये केर्बरला हा मान मिळाला. एकाच वर्षात दोन भाऊ पुरूष एकेरी व दुहेरीचे वर्ल्ड चॅम्पियन्स म्हणून निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. महिलांमध्ये हा मान जर्मनीच्या अँजेलिक केर्बरने मिळविला.
 
स्टेफी ग्राफनंतर हा मान मिळविणारी केर्बर ही जर्मनीची पहिलीच महिला टेनिसपटू बनली आहे. 1996 मध्ये स्टेफीला हा बहुमान मिळाला होता. 28 वर्षीय केर्बरने सेरेनाला हरवून ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकली. त्यानंतर अमेरिकन ग्रँडस्लॅम जेतेपद आणि ऑलिम्पिक रौप्यपदकही मिळविले.