1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
  4. Nadal defeated Nishikori

नदालकडून निशिकोरी पराभूत

Nadal
राफेल नदालने केई निशिकोरीला 6-0, 2-6, 6-2 ने पराभूत करत बार्सिलोना ओपन टेनिस टुर्नांमेंटच्या उपान्त्पूर्व फेरीत प्रवेश केला आहे. या टुर्नामेंटमध्ये अकरा वेळचा चॅम्पियन नदालने पहिला सेट सहजच जिंकला. मात्र जपानी खेळाडू निशिकोरीने दुसर्या सेटमध्ये दमदारपणे पुनरागमन करत स्कोअर 1-1 असा बरोकर केला.  
 
नदालने तिसर्या सेटमध्ये दोन वेळा निशिकोरीची सर्व्हिस भेदली व दुसर्या मॅच पाइंटआधारे विजय नोंदविला. नदालने पहिल्या फेरीतही तीन सेटमध्येच विजय प्राप्त केला होता. आता नदालचा आगामी सामना ब्रिटेनच्या कॅमरन नोरीशी होईल. डेव्हिड गॉफिन दुखापतीमुळे दुसर्या सेटमधून बाजूला झाल्याने नोरीला अंतिम आठमध्ये स्थान प्राप्त करता आले.
पुढील लेख
तिरंदाजी वर्ल्ड कप: महिला संघ अंतिम फेरीत