बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: हैदराबाद , शुक्रवार, 29 जानेवारी 2021 (15:10 IST)

सिंधू, किदाम्बी सलामीतच पराभूत

भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू आणि किदाम्बी श्रीकांत यांना बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स स्पर्धेतील पहिल्या साखळी सामन्यात   पराभवाचा  सामना करावा लागला. गट ‘बी'मधील महिला एकेरीच्या सामन्यात सिंधूवर जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी असणार्या. ताय झू यिंगने 21-19, 12-21, 17- 21 अशी मात केली. या सामन्यात सिंधूने यिंगला चांगली झुंज दिली. तिने पहिला गेम 21-19 असा जिंकला. मात्र, यानंतर यिंगने दमदार पुनरागमन करत पुढील दोन्ही गेम जिंकले. सिंधू आणि यिंग या दोघींमध्ये आतापर्यंत 21 सामने झाले असून 16 सामन्यात सिंधू पराभूत झाली आहे.
 
पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांतलाही विजयी सुरुवात करण्यात अपयश आले. पहिल्या साखळी सामन्यात डेनमार्कच्या अँडर्स अँटोनसनने श्रीकांतवर 15- 21, 21-16, 21-18 अशी मात केली. श्रीकांतने आक्रमक खेळ करत पहिला गेम 21-15 अशा मोठ्या फरकाने जिंकला. यानंतर त्याला चांगला खेळ करता आला नाही. अँटोनसनने मात्र आपला सर्वोत्तम खेळ करत हा सामना जिंकला. आता दुसर्यान साखळी सामन्यात सिंधूपुढे रॅटचनॉक इंटानोनचे, तर श्रीकांतपुढे वांग झू वेचे आव्हान असेल.