शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 21 ऑक्टोबर 2020 (14:18 IST)

सर्वांच्या अनुमतीनेच मी लंडनमध्ये आले : सिंधू

विश्व चॅम्पियन पी. व्ही. सिंधूने मंगळवारी स्पष्ट केले की, ती आपल्या परिवार आणि प्रशिक्षकांच्या सहमतीनेच लंडनमध्ये दाखल झाली आहे. यासोबतच तिने यापैकी कोणाशीही मतभेद असलेल्या बातम्यांना धुडकावून लावले. सिंधूच्या वडिलांनी हैदराबादमधील राष्ट्रीय शिबिराने ती आनंदी नसल्याचे सांगितले होते. सिंधू मागील दहा दिवसांपासून लंडनमध्ये असून तिने सोमवारी तेथील एक फोटोही टि्वट केला होता.
 
सिंधू तणावात असल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. तिने कौटुंबिक तणावामुळे देश सोडला आहे, असाही दावा करण्यात आला होता. त्यावर सिंधूने मंगळवारी टि्वटरद्वारे मत मांडले की, मी काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये दाखल झाले आहे. मी माझ्या जीएसएसआसोबत काही गोष्टींबाबत स्वतःवर काम करण्यासाठी येथे आले आहे. मी माझ्या आई-वडिलांच्या समहतीनेच येथे आले आहे.
 
याबाबत माझ्या कुटुंबीयांसोबत माझे कसलेही मतभेद नाहीत. माझ्या आयुष्यात माझ्या वडिलांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्याशी मतभेद असल्याचे कारणच नाही. माझे कुटुंब नेहमी माझ्या पाठीशी असते.मी माझ्या कुटुंबातील सदस्यांशी दररोज संपर्कात आहे.