1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. Sharad Pawar and Supriya Suleni meet PM Modi amid student protests

दिल्लीच्या राजकारणात मोठी घडामोड! विद्यार्थी आंदोलनादरम्यान शरद पवार-सुप्रिया सुळेंनी घेतली PM मोदींची भेट

संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना आणि दिल्लीतील जंतर-मंतरवर नीट (NEET) पेपर लीकप्रकरणी विद्यार्थ्यांचे आंदोलन तापले असतानाच, दिल्लीतून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (२२ जुलै) संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
 
या अचानक झालेल्या हाय-प्रोफाइल भेटीमुळे देशाच्या राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. मंगळवारीच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जंतर-मंतरवर जाऊन CJP चे आंदोलक विद्यार्थी आणि संस्थापक अभिजित दीपके यांची भेट घेतली होती. पोलिसांच्या कारवाईत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची विचारपूस केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी थेट पंतप्रधान मोदींची भेट घेतली. शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईचा आणि त्यांच्या मागण्यांचा मुद्दा पवारांनी पंतप्रधानांकडे मांडल्याचे समजते.

ही भेट अशा विधानांनंतर झाली ज्यात सुळे यांनी मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबतच्या (डीलिमिटेशन) विधेयकावर भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (NDA) सशर्त पाठिंबा दर्शवला होता. सुळे यांनी म्हटले होते की, जर सरकारने सर्व राज्यांमधील जागांमध्ये एकसमान ५० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला, तर राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) त्याला पाठिंबा देऊ शकते; अर्थात, त्या या विषयावर 'इंडिया' (INDIA) आघाडीमध्येही चर्चा करतील.
 
राजकीय वर्तुळात चर्चा
एकीकडे विरोधी पक्ष नीट प्रकरणावरून आणि दिल्ली पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला घेरण्याच्या तयारीत आक्रमक भूमिका घेत आहेत, तर दुसरीकडे शरद पवारांनी थेट पंतप्रधान मोदींशी संवाद साधून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. या भेटीमागचे नेमके कारण काय किंवा काही वेगळे राजकीय संकेत आहेत का, यावर राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
पुढील लेख
साडी भेट न दिल्याने संतापल्या पत्नीने घेतला जीव! प्रेशर कुकरने डोक्यावर वार करून पतीची हत्या