सिटसिपासचा पराभव करत नदाल उपांत्यफेरीत
जगातील दुसर्याप क्रमांकाचा टेनिस खेळाडू स्पेनच्या राफेल नदालने एटीपी फायनल्सच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. लंडनमध्ये खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत नदालने विद्यमान विजेता ग्रीसच्या स्टेफानोस सिटसिपासला पराभूत करत अंतिम 4 मध्ये प्रवेश केला. नदालने गुरूवारी सिटसिपासचा 6-4, 4-6, 6-2 ने पराभव केला. हा सामना दोन तास पाच मिनिटे चालला.
दिग्गज नदालने सहाव्यंदा या स्पर्धेत उपांत्यफेरीत धडक मारली आहे. ग्रुप लंडन- 2020 मध्ये त्याने दुसरे स्थान प्राप्त केले आहे. त्याचा पुढचा सामना रूसच्या डॅनियल मेदवेदेवशी होणार आहे. एटीपीच्या संकेतस्थळावर नदालच्या हवाल्याने लिहिले आहे की, उपांत्यफेरीत पोहोचणे व तेही वर्षातील अखेरच्या स्पर्धेत ही खूप मोठी गोष्ट आहे. मी यामुळे खूप आनंदी झालो आहे व उपांत्यफेरीत मेदवेदेवशी भिडायला सज्ज आहे.
गतवर्षी नदालने सिटसिपासला राउंब रॉबिनच्या अखेरच्या सामन्यात पराभूत केले होते. मात्र हा डावखुरा खेळाडू तरीही स्पर्धेबाहेर गेला होता. तो म्हणाला, मागील वर्षीप्रमाणे मी यंदाही दोन सामने जिंकले आहेत. त्यावेळी मला नशिबाची साथ लाभली नाही व मी उपांत्यफेरी गाठू शकलो नाही. मात्र हे वर्ष खूपच आव्हानात्क होते. मला आशा आहे की, मी माझे सर्वश्रेष्ठ योगदान देण्यासाठी तयार आहे.