गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 8 ऑक्टोबर 2020 (14:40 IST)

French Open : नदाल उपांत्य फेरीत

स्पेनच्या दुसऱ्या मानांकित राफेल नदालने दमदार कामगिरी करत विक्रमी १३व्यांदा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्टेफानोस त्सित्सिपासनेही सहज विजयासह उपांत्य फेरी गाठली. महिलांमध्ये सोफिया केनिन आणि पेट्रो क्विटोव्हा यांनीही आगेकूच कायम राखली.
 
नदालने आतापर्यंत एकही सेट न गमावता इटलीचा १९ वर्षीय युवा खेळाडू यानिक सिन्नेरला ७-६, ६-४, ६-१ असे पराभूत केले.