खेळाडूंच्या चाचण्यांसाठी ‘नाडा'कडून नव्या कर्मचार्यांची नेमणूक
कोरोनाच्या काळात सातत्याने मेहनत करणार्यांना आम्ही खेळाडूंची चाचणी करण्यासाठी पाठवणार नाही. कोरोनासारख्या आव्हानात्क काळात कार्य करणार्या वैद्यकीय चमूवरील ताण कमी करण्यासाठी राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्था (नाडा) खेळाडूंच्या चाचण्या करण्याकरीता नव्या दमाच्या कर्मचार्यांची नेमणूक करणार आहे.
कोरोनाच्या काळात सातत्याने मेहनत करणार्यांना आम्ही खेळाडूंची चाचणी करण्यासाठी पाठवणार नाही. त्यामुळे नेमकी कोणती क्रीडा संकुले आणि स्टेडियम खुली करण्यास परवानगी आहे, याविषयी क्रीडामंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर आम्ही नव्या वैद्यकीय चमूची नेमणूक करणार आहोत. हा वैद्यकीय चमू संपूर्ण देशभरात सुरू करण्यात आलेल्या क्रीडा संकुलांना आणि स्टेडियम्सना भेट देऊन तेथील प्रत्येक खेळाडूची तपासणी करेल, असे ‘नाडा'चे कार्यकारी संचालक नवीन अगरवाल यांनी सांगितले.