गुरूवार, 11 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: तेल अवीव , सोमवार, 18 मे 2020 (09:43 IST)

इस्रायलमध्ये चीनचे राजदूत डू वेई यांचा संशयास्पद मृत्यू

Suspected death
इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयानेही या वृत्ताला दुजोरा देत सांगितले आहे की चीनचे राजदूत डू वेई यांचा इस्त्राईलमध्ये संशयास्पद मृत्यू झाला आहे. हर्टजलिया येथील त्यांच्या घरी त्यांचा मृतदेह सापडला आहे. दरम्यान, इस्रायलमधील चीनच्या दूतावासाने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.

चीनच्या राजदूतांच्या मृत्यूची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला ते अद्याप समजलेले नाही. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मृतदेहावर कोणत्याही जखमा आढळल्या नसल्याचे इस्रायलच्या आर्मी रेडिओने म्हटले आहे.