रविवार, 28 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated : शुक्रवार, 29 ऑगस्ट 2025 (08:04 IST)

National Sports Day 2025 राष्ट्रीय क्रीडा दिन माहिती

भारतीय हॉकीचे जनक कोण?
National Sports Day 2025 मेजर ध्यानचंद, विश्वनाथन आनंद, कपिल देव ह्यांच्यापासून सचिन तेंडुलकर, सायना नेहवाल, पी.टी उषा, सुनील छेत्री, नीरज चोप्रा यांच्यापर्यंत आज अनेक असे खिलाडी होऊन गेले ज्यांनी वेळोवेळी जगात भारताची कीर्ती पसरवली आणि इतर लोकांना प्रेरणा दिली आहे. ह्यांनी केलेल्या कार्यांच्या सन्मानात आणि खेळाला आणखीन प्रोत्साहत देण्यासाठी राष्ट्रीय खेळ दिवस साजर केला जातो.
 
राष्ट्रीय खेळ दिवस दर वर्षी 29 ऑगस्ट रोजी साजर केला जातो. या दिवशी भारताचे महान हॉकी खिलाडी मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला होता आणि त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्याच्या हेतूने हा दिवस साजरा होतो. हा दिवस पहिल्यांदा 2012 साली साजरा करण्यात आला होता.
 
ह्या दिवशी भारताचे राष्ट्रपती मेजर ध्यानचंद खेळ रत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार ह्यांसारखे अनेक खेळ पुरस्कार वितरित करतात.
 
भारतात मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार आणि ध्यानचंद पुरस्कार हे हॉकी खिलाडी मेजर ध्यानचंदच्या सन्मानातच दिले जातात. दर वर्षी आंतरराष्ट्रीय पातळीवर चॅम्पियनशिप मध्ये जिंकलेल्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो आणि जीवनगौरव पुरस्कारच्या रूपात देखील हा दिला जातो.
 
आता आपल्या देशात खेळाला देखील प्रोत्साहन मिळत आहे. जिथे एक काळ होता जेव्हा आई-वडील आपल्या मुलांना खेळण्यास मनाई करत शिक्षणावर लक्ष देण्याचा सल्ला देत असायचे, तिथे आज ते ही आपले मुलांना देशासाठी खेळावे अशी तयारी ठेवतात.
 
भारतात खेळात सहभाग वाढल्याचे कारण आपण असे ही समजू शकतो की आज खेळ केवळ अॅक्टिव्हिटी नसून करिअरच्या रुपात देखील संधी म्हणून बघितले जाऊ लागले आहे. व्यक्तीचा विकास, देशाचे नाव, गौरव आणि प्रगतीसह व्यक्तीला चांगलं आयुष्य बनवण्याची संधी सुद्धा मिळते.
 
खेळ व्यक्तीचे मानसिक आणि शारीरिक दोघी प्रकारे विकास करतात. चेस जसे खेळ जिथे बुद्धी मजबूत करतात तिथे धावणं आणि मार्शल आर्ट्स सारखे खेळ शरीरला मजबूत बनवतात. काही खेळ जसे टेबले टेनिस, बॅडमिंटन हे बळ आणि बुद्धी, दोघांच्या प्रयोगाने खेळायचे असतात.
 
जर आपली कोणत्या खेळात रुची आहे आणि आपण त्यात काही करू इच्छित असाल तर नक्कीच त्यावर लक्ष द्या. काय माहीत पुढचा चॅम्पियन तुम्ही देखील असू शकतात.