शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Updated : शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (15:55 IST)

Neeraj Chopra: नीरज चोप्राचे या स्पर्धेतून पुनरागमन ?

niraj chopra
ऑलिम्पिक चॅम्पियन आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेता नीरज चोप्रा या महिन्यात पुन्हा मैदानात उतरू शकतात. लॉसने डायमंड लीगच्या संभाव्य खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले आहे. 26 ऑगस्टपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. वास्तविक, दुखापतीमुळे नीरज बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत भाग घेऊ शकले नव्हते. 
 
मात्र, नीरजने अद्याप लॉसने लीगमध्ये खेळण्याबाबत दुजोरा दिलेला नाही. गेल्या महिन्यात झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान त्यांच्या  गुडघ्याला दुखापत झाली होती. कार्यक्रमानंतर नीरज मांडीला पट्टी बांधताना दिसले. यानंतर 24 वर्षीय नीरजने बर्मिंघमला संघ रवाना होण्यापूर्वी काही दिवसांपूर्वी राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. 
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नीरज सध्या रिहॅबमध्ये आहे. वैद्यकीय पथक त्याची काळजी घेत आहे. तो लॉसने डायमंड लीगमध्ये भाग घेणार की नाही हे त्याचा संघ ठरवेल. त्याची माहिती येत्या आठवडाभरात समोर येईल. नीरज व्यतिरिक्त अविनाश साबळे लुसाने डायमंड लीगमध्ये भाग घेणार आहेत. अविनाश 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सहभागी होणार आहे. नुकतेच बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याने याच स्पर्धेत रौप्य पदक जिंकले होते.
 
नीरजच्या अनुपस्थितीतही बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीय संघाने चांगली कामगिरी केली. संघाने 22 सुवर्ण, 16 रौप्य आणि 23 कांस्य अशी एकूण 61 पदके जिंकली. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि कॅनडानंतर चौथ्या स्थानावर आहे.