मंगळवार, 2 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सर्बिया , शनिवार, 27 मे 2017 (10:05 IST)

आगासीचा नवा विद्यार्थी

novak
इटालियन ओपन स्पर्धेत अंतिम फेरीत पराभव चाखावा लागलेल्या सर्बियाच्या स्टार टेनिसपटूने म्हणजे नोवाक जोकोव्हिकने माजी वर्ल्ड नंबर वन टेनिसपटू आंद्रे आगासी याची प्रशिक्षक म्हणूज नियुक्ती केली आहे. 12 वेळा ग्रँड स्लॅम विजेत्या जोकोव्हिकने मे च्या सुरुवातीलाच आपल्या कोचिंग टीमपासून पूर्णपणे फारकत घेतली आहे. मिळालेल्या माहितीनुसार 28 मे पासून सुरू होतअसलेल्या फ्रेंच ओपन ग्रँड स्लॅम टूर्नामेंटसाठी आगासी जोकोव्हिकला प्रशिक्षण देत आहे. गेले काही आठवडे आगासी व जोकोव्हिक यांच्यात फोनवरून बोलणे होत आहे. पॅरिस टूर्नांमेटसाठी आम्ही एकत्र आलो यामुळे उत्साह वाढत असल्याचे जोकोविचने सांगितले आहे.