शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: हैदराबाद , सोमवार, 27 फेब्रुवारी 2017 (11:12 IST)

सिंधू बनणार उप जिल्हाधिकारी

रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील भारचाताची रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आता आंध्र प्रदेशात उप जिल्हाधिकारी बनणार आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी तिला ऑलिम्पिक पदकानंतर सरकारी सेवेचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी तिला उप जिल्हाधिकारी पदावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. सिंधूनेदेखील हा प्रस्ताव स्वीकारल्याचे तिची आई विजया यांनी सांगितले. ऑलिम्पिक पदकानंतर रेख पारितोषकांची खैरात सिंधूवर झाली असून, सध्या ती भारत पेट्रोलियममध्ये 2013 पासून सहायक व्यवस्थापक या पदावर काम करत आहे. सिंधूने आंध्र प्रदेश सरकारी सेवेत रुजू होण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता तिला भारत पेट्रोलियममधील नोकरी सोडावी लागणार आहे.