कामगिरी हे मापदंड ठरू नये: पंकज अडवाणी
खेळाडूंचे श्रेष्ठत्व ठरविण्यासाठी केवळ ऑलिम्पिकमधील कामगिरी हेच मापदंड ठरू नये, असे मत भारताचा अव्वल बिलियर्ड व स्नूकर खेळाडू पंकज अडवाणी याने व्यक्त केले. खेळाडूंची महानता ही त्याच्या चार वर्षातील कामगिरीच्या आधारावर ठरवावी. हे अतिशय अवघड आहे, परंतू त्यात परिवर्तन होणे गरजेचे आहे, असेही तो म्हणाला.
ऑलिम्पिकमध्ये स्नूकर व बिलियर्ड खेळाचा समावेश नसल्याबद्दल निराश वाटतो काय. असा सवाल केला असता त्याने उपरोक्त उत्तर दिले.
ऑलिम्पिकमध्ये केवळ आमच्या खेळाचा समावेश नाही म्हणजे आम्ही अन्य खेळाडूंपेक्षा कमी परिश्रम करतो असा अर्थ होत नाही, असे सोळा वेळचा विश्व बिलियर्ड्स व स्नूकर विजेता अडवाणी म्हणाला.