1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
  4. pankaj adwani

पंकज आडवाणीला सातव्यांदा आशियाई बिलियर्डस अजिंक्‍यपद

भारताचा सोळावेळा विश्‍वविजेता ठरलेला बिलियर्डसपटू पंकज आडवाणीने सातव्यांदा आशियाई बिलियर्डस अजिंक्‍यपद स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने भारताच्याच सौरव कोठारीवर 6-3 अशी मात केली. अंतिम लढतीच्या पहिल्या सत्रामध्ये कोठारीने 3-1 अशी आघाडी घेतली होती. पण विश्रांतीनंतर आडवानीने नंतर सलग पाच फ्रेम जिंकून सहाव्या आशियाई बिलियर्डस आणि एकूण सातव्या आशियाई विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. याच वर्षी त्याने 6 रेड स्नूकर स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते.
पुढील लेख
फारुख अब्दुल्ला श्रीनगर लोकसभा पोटनिवडणुकीत विजय