गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑगस्ट 2023 (07:20 IST)

Para Badminton: भगत-सुकांत जोडीने पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले

Badminton tournament
प्रमोद भगत आणि सुकांत कदम यांच्या जागतिक क्रमवारीत अव्वल पुरुष दुहेरी संघाने शेफिल्ड, इंग्लंड येथे चार देशांच्या पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत SL-3, SL-4 प्रकारात सुवर्णपदक जिंकले. भगतने एकेरी SL-3 प्रकारातही रौप्य पदक जिंकले. तसेच मिश्र दुहेरीत SL-3, SU-5 प्रकारात मनीषा रामदाससह रौप्यपदक जिंकले. कदमने एकेरी SL-4 प्रकारात कांस्यपदक पटकावले. 
 
भगत आणि कदम ने भारतातील दीप रंजन बिसोयी आणि मनोज सरकारचा  21-17, 21-17  असा पराभव करत सुवर्ण पदक पटकावले.एकेरीत भगतला इंग्लंडच्या डॅनियल बेथेलकडून 8-21, 10-21 असा पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीत भगत आणि रामदास यांना इंडोनेशियाच्या हिकमत रामदानी आणि लिनी यांच्याकडून21-17, 21-17 असा पराभव पत्करावा लागला. 

भगत म्हणाले, मी दुहेरीच्या निकालावर खूश आहे पण एकेरी आणि मिश्र दुहेरीत नाही. या वर्षी बेथेलने मला खूप आव्हान दिले आहे आणि त्याला हरवण्यासाठी मला माझ्या खेळात सुधारणा करावी लागेल.
 
 




Edited by - Priya Dixit