रविवार, 28 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: बुधवार, 5 जुलै 2017 (11:26 IST)

प्रेग्‍नेंट असल्यानंतर देखील विम्बल्डन टेनिस स्पर्धेत खेळली मिनेला

pregnant tennis player
जगातील अव्वल महिला टेनिसपटू सेरेना विल्यम्सने गर्भवती असल्यामुळे फ्रेंच ओपन व विम्बल्डन स्पर्धेतून माघार घेतली आहे. परंतु लक्‍झेम्बर्गची युवा टेनिसपटू मॅन्डी मिनेला हिने मात्र गर्भवती असतानाच विम्बल्डनच्या पहिल्या फेरीत खेळण्याचा आगळा पराक्रम केला.
 
इटलीची अनुभवी खेळाडू फ्रॅन्सेस्का शिव्हॉन हिच्याविरुद्ध पहिल्या फेरीत खेळताना “बेबी बंप’ लपविण्यासाटी मिनेलाने सैलसर पोशाख परिधान केला होता. त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले. मिनेलाने ही लढत 1-6, 1-6 अशी गमावली असली, तरी तिची इच्छाशक्‍ती आणि विम्बल्डनप्रेमाला दाद दिल्याशिवाय कोणालाच राहवणार नाही.
 
पहिल्या अपत्यजन्मासाठी या वर्षाच्या उत्तरार्धातील तारीख डॉक्‍टरांनी दिली आहे. मिनेलाला सध्या पाचवा महिना सुरू आहे. तरीही तिने आपल्या आवडत्या विम्बल्डनमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला. तसेच पती व प्रशिक्षक टिम सोमरसोबत विम्बल्डनच्या हिरवळीवर पोज देतानाचे छायाचित्रही तिने सोशळ मीडियावर पोस्ट केले आहे.