शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

कुटुंबासाठी पैसे वापरणार: तोमर

प्रो- कबड्डी लीगच्या पाचव्या मोसमासाठी खेळाडूंचा लिलाव झाला. यंदाच्या मोसमात चार नव्या संघाचा समावेश झाला असून एकूण 12 संघांनी खेळाडूंवर बोली लावली. नितीन तोमर या सत्रात सर्वात महागडा खेळाडू ठरला. पीकेएलमध्ये नव्याने दाखल झालेल्या टीम यूपीने त्याला 93 लाखांमध्ये तोमरला खरेदी केले. 
 
लिलावानंतर नितीन तोमरला हे 93 लाख रूपये कसे आणि कुठे खर्च करणार याबाबत सध्या त्याला सर्वांनी प्रशन विचारले असता तो म्हणाला लवकरच माझ्या बहिणेचे लग्न होणार आहे. त्यासाठी मला हे पैसे वापरायचे आहेत. तसेच आमची शेती आहे, त्यासाठीही मी पैसे खर्च करणार आहे, असे तोमरने यावेळी सांगितले.