गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: सोमवार, 17 ऑक्टोबर 2016 (15:32 IST)

मल्ल साक्षी मलिकचा साखरपुडा

रिओ ऑलिम्पिकची कांस्यविजेती महिला मल्ल साक्षी मलिक हिचा बॉयफ्रेंड मल्ल सत्यव्रत कदियान याच्यासोबत साखरपुडा झाला. रोहतक येथे निवासस्थानी हा कार्यक्रम पार पडला. हा कार्यक्रम खासगी स्वरूपात झाला. यावेळी दोघांच्या घरची मंडळी हजर होती. सत्यव्रत २२ वर्षांचा आहे. साक्षीपेक्षा तो दोन वर्षांनी लहान आहे. साल २०१० च्या यूथ ऑलिम्पिकमध्ये त्याने कांस्य जिंकले होते. दोघांची कुस्ती स्पर्धेदरम्यान भेट झाली होती. आणि त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला आहे.