फेडरर टॉप-10 मध्ये!
पॅरिस- स्वित्झर्लडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने तब्बल पाच वर्षाच्या कालखंडानंतर ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावत ग्रँड स्लॅमचा दुष्काळ संपुष्टात आणला. या शानदार कामगिरीसह फेडररने जाही र झालेल्या ताज्या पुरूष एटीपी टेनिस क्रमवारीत टॉप-10 मध्ये प्रवेश केला आहे. ब्रिटनचा अँडी मरे अग्रस्थानी कायम असून सार्बियचा जोकोव्हिक दुसर्या स्थानी आहे.
ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँड स्लॅम जिंकताना फेडररने कारकिर्दीतील 18 वे जेतेपद पटकावले. या शानदार कामगिरीचा त्याला फायदा झाला असून सात स्थानाची झेप घेताना दहाव्या स्थानी उडी घेतली आहे. फेडररचे आता 3260 गुण आहेत.
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये तिसर्या फेरीतून बाहेर पडलेला ब्रिटनचा मरे 11,540 गुणासह अग्रस्थानी, सर्बियन नोव्हॅक जोकोव्हिक 9, 828 तर स्वित्झर्लंडच्या याथरिंका 5,695 गुणासह तिसर्या स्थानी आहे. कॅनडाच्या मिलोस रेऑनिकची मात्र एका स्थानाने घसरण झाली असून तिसर्या स्थानावरून तो चौथ्या स्थानी आला आहे. जपानच्या निशीकोरी पाचव्या तर स्पेनचा नादाल सहाव्या स्थानी आहे.