बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: मांट्रियल , गुरूवार, 3 ऑगस्ट 2017 (11:52 IST)

फेडरर प्रथमच खेळणार सहा वर्षानंतर मांट्रियल टुनामेंट

मागील महिन्यात झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत विक्रमी 19वे ग्रॅड स्लॅम जिंकणारा रॉजर फेडरर सहा वर्षानंतर प्रथमच मांट्रियल एटीपी स्पर्धेत खेळणार आहे. यापूर्वी तो 2011मध्ये या स्पर्धेत खेळला होता.
 
ही स्पर्धा सोमवार (दि. 7) सुरू होणार आहे. ही स्पर्धा मौसमातील शेवटच्या युएस ओपन ग्रॅड स्लॅम स्पर्धेपूर्वी खेळाडूंना आपली तयारी करण्यासाठी महत्त्वपूर्ण मानली जाते. 35 वर्षीय फेडरर म्हणाला, हे सत्र माझ्यासाठी चांगले ठरले आहे. या स्पर्धेत अनेक वर्षांपासून मी खेळू शकलो नाही. मात्र, आता या स्पर्धेत पुन्हा खेळण्यासाठी मी उत्सूक आहे.
 
यंदाच्या मौसमात फेडररने पाचव्यांदा ऑस्ट्रेलिय ओपन आणि विक्रमी आठव्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद जिंकले आहे. त्याने इंडियन वेल्स, मियामी आणि हाले येथेही विजेतेपद जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. फेडरर मंगळवारी (दि. 8) 36वा वाढदिवस मांट्रियल येथेच साजरी करणार आहे. तसेच विम्बल्डन स्पर्धेनंतर फेडररची ही पहिली स्पर्धा आहे. यापूर्वी त्याने 2004 आणि 2006मध्ये मांट्रियल स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे.