बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , मंगळवार, 13 जुलै 2021 (23:44 IST)

रोनाल्डो गोल्डन बूट पुरस्काराने सन्मानित

पोर्तुगालचा स्टार स्ट्रायकर ख्रिस्टियानो रोनाल्डोने युरोपीय फुटबॉल चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक 5 गोलकरत गोल्डन बूटचा पुरस्कार प्राप्त केला आहे. झेक गणराज्याचा फॉरवर्ड खेळाडू पॅट्रिक सीकनेही रोनाल्डोच्या बरोबरीने 5 गोल केले होते. मात्र, पोर्तुगालच्या या दिग्गज खेळाडूने केवळ चार सामने खेळताना एक गोल करण्यात मदतही केली होती. ज्यामुळे त्याला हा पुरस्कार मिळाला.
 
पोर्तुगालचा संघ स्पर्धेत अंतिम 16 मध्ये बेल्जियमकडून 0-1 ने पराभूत होऊन बाहेर पडला होता. गोल्डन बूटच्या शर्यतीत तिसर्याध स्थानी फ्रान्सचा करीम बेंजोमा होता. त्याने युरो कपमध्ये 4 गोल केले होते. रोनाल्डाने हंगेरीविरुध्द 3-0 च्या विजयात दोन गोल केले. त्यानंतर तिसर्या सामन्यात फ्रान्सबरोबर 2-2 ने बरोबरीत सुटलेल्या सामन्यात त्याला  पेनल्टी शूटआउटमध्ये 2 गोल करण्यात यश मिळाले.