गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

संदीप सिंगला मानद डॉक्टरेट

चंदीगड- भारतीय हॉकी संघातील स्टार खेळाडू संदीप सिंगला पंजाबमधील भगत विश्वविद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी देत सन्मान केला आहे. माजी हॉकीपटू दिलीप टर्कीनंतर मानद डॉक्टरेट पदवी मिळालेला संदीप भारताचा दुसरा हॉकीपटू ठरला आहे. याआधी 2010 मध्ये संबलपुर विश्वविद्यापीठाने दिलीप टर्कीला मानद डॉक्टरेट पदवी देऊन गौरवले होते.
 
मानद डॉक्टरेट पदवी मिळणे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. अशी प्रतिक्रिया संदीपने यावेळी दिली. 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये झालेल्या दुखापतीनंतर ड्रगल्फिकर संदीप सिंग भारतीय संघाबाहेर आहे.