संदीप, हरदीपची पुरस्कारासाठी शिफारस
फ्री स्टाईल मल्ल संदीप तोमर व ग्रीको रोमन मल्ल हरदीपसिंग यांची भारतीय कुस्ती संघटनेने प्रतिष्ठेच्या अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे. संदीपने गतवर्षी राष्ट्रकुल व आशियाई स्पर्धेचे सुवर्ण जिंकले असून दुसरीकडे, हरदीपने आशियाई स्पर्धेत रौप्य तर राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
राष्ट्रीय प्रशिक्षक कुलदीप मलिक यांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी व सतीश कुमार, जयप्रकाशल अनिल कुमार व आरसी सारंग यांची ध्यानचंद पुरस्कारासाठी यापूर्वीच शिफारस केली गेली आहे. महिला गटातून मात्र एकही शिफारस न पाठवण्याचा निर्णय घेणे आश्चर्याचे ठरले आहे.