सानियाला संताप
नवी दिल्ली- आपल्या खेळाकडे लक्ष देण्यापेक्षा सेवकरासंदर्भातील नोटीसची माध्यमांनी अधिक दखल घेतल्याबाबत भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाने संताप व्यक्त केला आहे. हल्ली माध्यमांकडे सकारात्मक पेक्षा नकरात्मक गोष्टींना महत्त्व देत असल्याचे दिसते, असेही ती म्हणाली.
काही दिवसांपूर्वी सेवाकर भरला नसल्याबाबत सानियाला नोटीस बजावण्यात आली होती.