बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. खेळ मराठी
  3. क्रीडा वृत्त
Written By

सेरेनाने मोडला स्टेफीचा विक्रम

सेरेना विल्यम्सने ऑस्ट्रेलियन ओपन २०१७च्या महिला एकेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले. बहीण व्हीनसचा ६-४, ६-४ असा पराभव करत सेरेनाने स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या विजयामुळे सेरेनाने स्टेफी ग्राफचा २२ ग्रँड स्लॅम्सचा रेकॉर्ड मोडला आहे.

सेरेनाचे हे करीअरमधील २३ वे ग्रँडस्लॅम असून ऑस्ट्रेलियन ओपनचे सातवे जेतेपद आहे. 
महिला टेनिसच्या इतिहासात मार्गारेट कोर्टच्या नावावर सर्वाधिक 24 ग्रँड स्लॅम विजेतीपदं आहेत. मार्गारेट कोर्टच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी सेरेना विल्यम्सला आता केवळ एका विजेतेपदाची आवश्यकता आहे.